बावनकुळे यांनी मांडला छ. संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट व दूरदृष्टीपूर्ण आराखडा
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या संवादातून शहराच्या विकासाचा
संभाजीनगरच्या उज्ज्वल भविष्याचा निर्धार आणि विकासाची ठोस दिशा


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या संवादातून शहराच्या विकासाचा पुढील प्रवास, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित मूलभूत सुविधा, भविष्यातील संधी आणि जनतेच्या अपेक्षा यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रबुद्ध संमेलन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या संमेलनात शहरातील प्रबुद्ध नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, विचारवंत, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट व दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडत, भारतीय जनता पार्टीच्या सक्षम नेतृत्वाखाली शहरात पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, उद्योगविकास, वाहतूक, स्वच्छता व आधुनिक नागरी सोयी-सुविधांना वेग देण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांचा विश्वास, सहभाग आणि पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत, विकास, सुशासन व स्थैर्यासाठी कमळ या निशाणीसमोरील पाठिंबा भारतीय जनता पार्टीला देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

हे प्रबुद्ध संमेलन म्हणजे केवळ बैठक नसून, छत्रपती संभाजीनगरच्या उज्ज्वल भविष्याचा निर्धार आणि विकासाची ठोस दिशा ठरवणारे प्रभावी पाऊल ठरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande