
अकोला, 07 जानेवारी (हिं.स.)
अकोला रेल्वे स्थानकाचे चेहरा मोहरा बदलण्याचा काम तसेच गतिशील टर्मिनल, विमान सेवा विमानतळासाठी 209 कोटी रुपये पशुवैद्यकीय महाविद्यालय सारख्या योजना तसेच विमान पायलट संस्था उभारणीचा निर्णय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे तसेच अकोला शहरातील प्रत्येक समस्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून 2017 मध्ये दिलेले अभिवचनपूर्ती 99% भारतीय जनता पक्षाने पूर्ण केली आहे एकमेव पक्ष आहे की जो शब्द देतो त्या शब्दाला पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्ष करत असते आणि त्यासाठी जनता जनार्दनाचा आशीर्वाद स्वर्गीय गोवर्धन शर्मा, माजी मंत्री संजय धोत्रे, प्रमिलाताई टोपले, गणेशराव ढगे, टीकमदास मोटवानी, एडवोकेट शंकरराव समुद्र, स्वर्गीय वसंतराव देशमुख, दयाचंद अग्रवाल, बळीराम चापले भाऊसाहेब लहाने, भाऊसाहेब फुंडकर, शंकर लालजी खंडेलवाल, मदनलाल खंडेलवाल, सारख्या असंख्य कार्यकर्ते नेते यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला आहे आणि विचारसरणी कायम ठेवून शब्दाला जगणारा पक्ष असून यासाठी भारतीय जनता पक्षाला जनताजनार्गाचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला पूर्ण करण्यासाठी अकोल्याचे शिल्पकार विनयकुमार पाराशर यांनी घडवलेला अकोला याला विकास विकसित अकोला करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं असून त्या पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
प्रभाग नऊ मध्ये शितल गायकवाड ज्योती मानकर हर्ष चौधरी, अजय रामटेके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते सभेचे अध्यक्षस्थानी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते विलास शेळके हे होते. मंचावर गोपाल नागापुरे, निलेश निनोरे, आधी विराजमान होते.
भारतीय जनता पक्ष विकास आणि काम याच विषयावर प्रचार करणार आहेत व्यक्तिगत टीका हा आमचा विषय नाही कोणत्याही पक्षावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्ष काय करणार आहे आणि आम्ही काय केलं याच मक्तावर आम्ही भारतीय जनता पक्ष मतदान राजाला मागत असल्याचेही यावेळी खासदार धोत्रे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे