रत्नागिरी : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत फिनोलेक्सची प्रायोगिक एकांकिका प्रथम
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : पुरुषोत्तम करंडक या महाराष्ट्रातील नामांकित व प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या महाअंतिम फेरीत येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका हा मानाचा पुरस्कार
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत फिनोलेक्सची प्रायोगिक एकांकिका प्रथम


रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : पुरुषोत्तम करंडक या महाराष्ट्रातील नामांकित व प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धेच्या पुण्यात झालेल्या महाअंतिम फेरीत येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिका हा मानाचा पुरस्कार पटकावला.

यासोबतच या स्पर्धेतील महाअंतिम फेरीची पहिलीच ट्रॉफी फिनोलेक्स ॲकॅडमीने मिळवली आहे. विशेष बाब म्हणजे रत्नागरी विभागातील कोणत्याही महाविद्यालयाला आजवर हा करंडक मिळालेला नाही. त्यामुळे फिनोलेक्स ॲकॅडमीने हा सन्मान मिळवून रत्नागिरी केंद्राच्या शरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत फिनोलेक्स ॲकॅडमीच्या दोन एकांकका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या, ज्यामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत त्यांनी मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. राज्यभरातील १७ नामांकित महाविद्यालयांमध्ये झालेल्या मेगाफायनल फेरीत फिनोलेक्स ॲकॅडमीने उल्लेखनीय कामगरी केली. संजय पवार, चंद्रशेखर ढवळीकर, अमित फाळके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मेगा फायनलमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘ ठोग्या’ या एकांकिकेला सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून कुमार जोशी करंडक प्रदान करण्यात आला. तसेच ‘तुकारामाची टोपी’ या एकांकिकेमधील प्रभावी भूमिकेसाठी कु. गायत्री शिंदे हिला विशेष अभिनय नैपुण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

एकांकिकेच्या लेखन दिग्दर्शनासाठी यश मोडक, प्रतीक घाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एल. डी. नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी संघाला भरघोस पाठिंबा दिला.

हे यश विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसह त्यांची कलात्मकदृष्टी, प्रयोगशीलता आणि संघभावना यांचे फलित असून, फिनोलेक्स ॲकॅडमीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत एक नवा इतिहास जोडणारे ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande