आता महाराष्ट्राची हास्यजत्रा रसिकांच्या अंगाखांद्यावर रंगणार
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा आता एका नव्या आणि स्टायलिश रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांच
हास्यजत्रा


मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा आता एका नव्या आणि स्टायलिश रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांचे गाजलेले डायलॉग्स, पात्रांची सिग्नेचर स्टाईल आणि प्रेक्षकांचे अफाट प्रेम लक्षात घेऊन, सोनी मराठीने प्रसिद्ध मर्चेंडाइझ ब्रँड सुखी आत्मा सोबत अधिकृत भागीदारी जाहीर केली आहे.

या सहयोगांतर्गत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ब्रँडेड अधिकृत मर्चेंडाइझ लाँच करण्यात आली असून, यामध्ये टी-शर्ट्स, हुडीज आणि निवडक ॲक्सेसरीजचा समावेश आहे. या मर्चेंडाइझच्या माध्यमातून महाराष्ट्राची हास्यजत्रेतील तुमच्या आवडत्या कलाकारांचे गाजलेले संवाद आणि त्यांची खास शैली आता थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. प्रेक्षकांचे अतिशय आवडते ‘लॉली’, लोचन मजनु, ‘अगं अगं आई’ यांसोबतच सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी आणि इतर लोकप्रिय पात्रांचे संवाद आता चाहत्यांना प्रत्यक्ष परिधान करता येणार आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांसाठी केवळ एक शो नसून, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. या शोमधील संवाद प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. सोनी मराठी वाहिनीच्या ‘सुखी आत्मा’ सोबतच्या या भागीदारीमुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या शोप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याची एक नवी, हटके आणि स्टायलिश संधी मिळणार आहे.

सोनी मराठी वाहिनीचा उद्देश एकच आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा द्वारे प्रेक्षकांना सातत्याने आनंद देणे. या अधिकृत मर्चेंडाइझच्या माध्यमातून हास्यजत्रेची ऊर्जा, विनोद आणि आपुलकी घराघरात पोहोचवण्याचा हा एक खास प्रयत्न आहे.

हास्यजत्रेचे हे अधिकृत मर्चेंडाइझ आता सुखी आत्मा च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, चाहते आपल्या आवडत्या डायलॉगचे टी-शर्ट्स आणि इतर मर्चेंडाइझ सहज ऑर्डर करू शकतात. या लिंक वर जाऊन प्रेक्षक आपले आवडते मर्चेंडाइझ ऑर्डर करू शकता.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande