नागपूरच्या किम गोखले टेक्सासमधील मराठी मंडळाच्या अध्यक्षपदी
नागपूर, 06 जानेवारी (हिं.स.) बृहन् महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेशी (कॅनडा–अमेरिका) संलग्नीत आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑस्टिन मराठी मंडळ (एएमएम), टेक्सास या सेवाभावी व सांस्कृतिक (नॉनप्रॉफीट) संस्थेच्या अध्यक्षप
किम सलील गोखले


नागपूर, 06 जानेवारी (हिं.स.) बृहन् महाराष्ट्र मंडळ उत्तर अमेरिकेशी (कॅनडा–अमेरिका) संलग्नीत आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑस्टिन मराठी मंडळ (एएमएम), टेक्सास या सेवाभावी व सांस्कृतिक (नॉनप्रॉफीट) संस्थेच्या अध्यक्षपदी किम सलील गोखले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किम गोखले या मूळच्या नागपूरकर असून त्या रेखा आणि दिलीप देवधर यांच्या सुकन्या आहेत. किम यांचे वडिल दिलीप देवधर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि प्रथितयश उद्योजक आहेत. किम यांच्या यशाचे नागपूरच्या सांस्कृतिक, सामाजिक वर्तुळात कौतुक होतेय.

किम देवधर यांचे शालेय शिक्षण धरमपेठ शिक्षण संस्थेच्या आर. एस. मुंडले समर्थ नगर शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या एलएडी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले असून एमए सायकोलॉजी या विषयात त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (अभाविप) नागपूर महानगर सहमंत्री म्हणून कार्य करत नेतृत्व, संघटनकौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे धडे घेतले. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी 12 सदस्यांच्या सक्षम पॅनेलसह अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आणि त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.यानंतर त्यांनी फ्लोरिडा विद्यापीठातून येथून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ही पदवी संपादित केली. पिरामल फाउंडेशनमार्फत राजस्थानमध्ये सेवाभावी इन्टर्नशि आणि अमेरिकेत मराठी मुलांच्या शाळेत अध्यापन तसेच भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सध्या त्या ऑस्टिन मराठी मंडळाच्या माध्यमातून नवीन पिढीतील युवकांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व नेतृत्वविकासाच्या नव्या उपक्रमांवर त्यांचे नियोजन सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande