रत्नागिरी : देवरूखमध्ये ९ जानेवारीपासून स्वरोत्सव
रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख येथील अभिरुची संस्थेतर्फे वार्षिक स्वरोत्सव संगीत महोत्सव ९ ते ११ जानेवारी या कालावधीत पित्रे प्रायोगिक कलामंचावर रोज रात्री ९.३० वाजता होणार आहे. महोत्सवाचे हे एकविसावे वर्ष असून दर्जेदार शास्त्रीय संगीत,
रत्नागिरी : देवरूखमध्ये ९ जानेवारीपासून स्वरोत्सव


रत्नागिरी, 6 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख येथील अभिरुची संस्थेतर्फे वार्षिक स्वरोत्सव संगीत महोत्सव ९ ते ११ जानेवारी या कालावधीत पित्रे प्रायोगिक कलामंचावर रोज रात्री ९.३० वाजता होणार आहे. महोत्सवाचे हे एकविसावे वर्ष असून दर्जेदार शास्त्रीय संगीत, वादन आणि संगीत नाटकांचा समावेश आहे.

पहिल्या दिवशी ९ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत साथ करणार आहेत. शनिवारी, १० जानेवारीला व्हायोलिन वादक मनास कुमार यांची मैफल असून त्यांना तबल्यावर तनय रेगे यांची साथ लाभणार आहे. अखेरच्या दिवशी दि. ११ जानेवारीला स्वरोत्सवाची सांगता (कै.) चि. य. मराठे लिखित व पं. भालचंद्र पेंढारकर यांच्या संगीताने सजलेल्या 'होनाजी बाळा' या अजरामर संगीत नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. सावंतवाडीच्या तपस्या संस्थेचे कलाकार हा नाट्याविष्कार सादर करणार आहेत.

सर्व कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून, देवरूख व परिसरातील संगीत-नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभिरुचीतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande