भाजप एक विकसित, आधुनिक व लोकाभिमुख शहर उभारण्याच्या ठाम भूमिकेत - बावनकुळे
छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।विभागीय कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी तथा राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न झा
शहराचा सर्वांगीण कायापालट करून एक विकसित, आधुनिक व लोकाभिमुख शहर उभारण्याच्या ठाम भूमिकेत


छत्रपती संभाजीनगर, 06 जानेवारी (हिं.स.)।विभागीय कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी तथा राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न झाली.

या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका, निवडणूक धोरण आणि आगामी विकासात्मक दृष्टीकोन सविस्तरपणे मांडण्यात आला.

बावनकुळे सायांनी गितले की, भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नसून, छत्रपती संभाजीनगर शहराचा सर्वांगीण कायापालट करून एक विकसित, आधुनिक व लोकाभिमुख शहर उभारण्याच्या ठाम भूमिकेत आहे.

यावेळी त्यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी उपक्रम, उद्योग व रोजगारनिर्मिती, महिला व युवक सक्षमीकरण, तसेच शिक्षण व आरोग्य सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये ठोस व कालबद्ध विकासकामे राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे स्पष्ट कृती आराखडा असल्याचे ठामपणे नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्यानंतर रखडलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता व सुशासन प्रस्थापित केले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधत, शहराच्या विकासासाठी नागरिकांचा विश्वास, सक्रिय सहभाग आणि संघटित ताकद अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर भक्कम सत्ता स्थापन करून शहराला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेईल, असा दृढ निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande