
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.) खुलताबाद तालुक्यात मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत खुलताबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सौर पंप बसविण्यात आले आहेत. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे, वाढत्या वीजबिलामुळे मुळे आणि डिझेल खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी, शेती उत्पादन खर्चात लक्षणीय घट होऊन उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा सातत्यपूर्ण वीजपुरवठा मिळत आहे.
माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यात २०५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा लाभदेण्यात आला आहे.
लोडशेडिंग आणि डिझेल पंपाचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. मात्र, सौर पंप बसल्यानंतर शेतकरी वीजबिलमुक्त झाले आहेत. आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. डिझेलवरील अवलंबित्व संपल्याने दरवर्षी हजारो रुपयांची बचत होत आहे.
कृषी सौर ऊर्जा योजनेचा लाभघ्यावा तालुका कृषी विभागाकडून अधिकाधिक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात खुलताबाद तालुका सौर ऊर्जेवर आधारित शेतीचे आदर्श मॉडेल बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis