
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पार्टीला भक्कम जनादेश मिळेल, असा विश्वास दुग्धविकास मंत्री अतुल सावी आणि भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी प्रचार दौरे सुरू केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७, औरंगपुरा (संभाजीपेठ) येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सिमा सिद्धार्थ साळवे, श्री. अनिल श्रीकिशन मकरीये, किर्ती महेंद्र शिंदे, श्री. समीर सुभाष राजुरकर यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील संघटन अधिक बळकट करून नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis