मनपा निवडणूकीसाठी मतदान म्हणजे भ्रष्टाचार, खोटारडेपणा विरोधात थेट सत्ताधाऱ्यांना जाबच - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी मतदान म्हणजे भ्रष्टाचार, खोटारडेपणा आणि जनतेच्या फसवणुकीविरोधात दिला जाणारा थेट सत्ताधाऱ्यांना जाबच आहे, अशा शब्दात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोध
भ्रष्टाचार, खोटारडेपणा आणि जनतेच्या फसवणुकीविरोधात दिला जाणारा थेट सत्ताधाऱ्यांना जाबच


छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी मतदान म्हणजे भ्रष्टाचार, खोटारडेपणा आणि जनतेच्या फसवणुकीविरोधात दिला जाणारा थेट सत्ताधाऱ्यांना जाबच आहे, अशा शब्दात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. छत्रपती संभाजी नगर शहरात प्रचाराच्या दरम्यान ते बोलत होते

अंबादास दानवे म्हणाले की,

प्रभाग क्रमांक 27 मध्ये शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य रॅलीला आज उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून निष्ठा, विश्वास आणि स्वाभिमानाचा हा सत्ताधाऱ्यांना दिलेला इशाराच आहे.

शिवसेना अधिकृत उमेदवार

सौ. प्रज्ञा मोहन म्हस्के श्री. विनोद विठ्ठल सोनवणे सौ. सरस्वती खंडू आवटे श्री. संतोषकुमार विठ्ठलराव पाटील यांच्या प्रचारार्थ ही रॅली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande