नांदेड - वाळू उत्खननावर धडक कारवाई; ४० ब्रास अवैध वाळू साठा जप्त
नांदेड, 9 जानेवारी, (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. या कार्य
अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई


नांदेड, 9 जानेवारी, (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे.

या कार्यवाही दरम्यान वाळूने भरलेला एक हायवा ट्रक, दोन जेसीबी पोकलेन मशीन तसेच अंदाजे ४० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर महसूल विभागामार्फत २ लाख ८३ हजार रुपये तसेच परिवहन विभागामार्फत ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

तसेच प्रत्येकी दोन जेसीबी पोकलेन मशीनवर परिवहन विभागामार्फत प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून या संपूर्ण कारवाईत दोन मशीनवर एकूण १५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या कारवाईत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार श्री. पाठक, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्तेवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून दोषीवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande