नाशिक - आडगाव भागात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल
नाशिक, 09 जानेवारी (हिं.स.)। : आडगाव परिसरात घटना दोन ठिकाणी वीजचोरीच्या उघडकीस आल्या असून, वीजचोरी करणाऱ्या चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणाच्या भरारी पथकाचे अहिल्यानगर येथील सहाय्यक अभियंता धनंजय त्रिंबक एकबोटे या
नाशिक - आडगाव भागात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल


नाशिक, 09 जानेवारी (हिं.स.)। : आडगाव परिसरात घटना दोन ठिकाणी वीजचोरीच्या उघडकीस आल्या असून, वीजचोरी करणाऱ्या चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणाच्या भरारी पथकाचे अहिल्यानगर येथील सहाय्यक अभियंता धनंजय त्रिंबक एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे.

वीजचोरीचा पहिला प्रकार आडगाव नाका येथे ओमनगरमध्ये उघडकीस आला. आरोपी बाळासाहेब छबीलाल पाटील व निखिल विजय पाटील (दोघेही रा. वृंदावन, ओमनगर, आडगाव नाका) यांनी बारा महिन्यांच्या कालावधीत एकूण युनिट्सची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे ३५ हजार ५७० रुपयांची वीजचोरी केल्याचे पथकाच्या लक्षात आले, तर वीजचोरीची दुसरी घटना ओमनगर येथे उघडकीस आली.

आरोपी गोदावरी हरिश्चंद्र अग्रहारी व अमरचंद हरिश्चंद्र अग्रहारी (दोघेही रा. वृंदावन, ओमनगर, आङगाव नाका) यांनीही सत्तावीस महिन्यांच्या कालावधीत २०४५ युनिट्सची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले.

अग्रहारी यांनीही वीज कंपनीची २७ हजार ७८० रुपये किमतीची वीजचोरी केली असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. या दोन्ही वीजचोरीप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार वीजग्राहकांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande