सत्तेचाळीस गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपळगाव बसवंत, 9 जानेवारी, (हिं.स.)। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पशु संरक्षण अधिनियम व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आठ जानेवारी
सत्तेचाळीस गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


पिंपळगाव बसवंत, 9 जानेवारी, (हिं.स.)। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पशु संरक्षण अधिनियम व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिरवाडे वणी शिवारातील शिरवाडे वणी फाट्याजवळ करण्यात आली.

याप्रकरणी विजय भास्करराव चोपडे (वय सत्तेतीस, कांदा व्यापारी, रा. पिंपळगाव बसवंत) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अल्ताफ खान मोहम्मद खान (रा. मध्यप्रदेश), शेख शाहिद शेख रशीद (रा. मालेगाव), शोएब खान समीर खान (रा. मालेगाव) तसेच इरफान गफुर खान उर्फ इरफान काल्या (रा. उंबरठाण, ता. सुरगाणा) यांचा समावेश आहे.

आरोपींनी अशोक लेलँड कंपनीच्या एम एच अठरा / बी जी सहाशे शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रकमधून विनापरवाना सत्तेचाळीस गोवंश जनावरे (गायी, गोऱ्हे, बैल व वासरे) कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने भरून वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या वाहतुकीदरम्यान एका गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.पोलिसांनी सुमारे सोळा लाख तेवीस हजार रुपये किंमतीचा ट्रक व जनावरे ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज प्रकाश निकम करत आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande