ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा
वॉशिंग्टन , 09 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला 60 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमध्ये संयुक्त राष्ट्रांशी संबंधित अनेक निकायांसह भारत-फ्रान्स यांच्या नेतृ
ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा


वॉशिंग्टन , 09 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला 60 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांमध्ये संयुक्त राष्ट्रांशी संबंधित अनेक निकायांसह भारत-फ्रान्स यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन (इंटरनॅशनल सोलर अलायन्स – आयएसए ) याचाही समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने या संस्थांना अमेरिकेच्या हितासाठी अनावश्यक तसेच हितविरोधी ठरवले आहे. दरम्यान या विषयावर भारत सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी “संयुक्त राज्य अमेरिकेच्या हितांच्या विरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था, परिषद आणि करारांमधून माघार घेण्यासंदर्भातील” एका ज्ञापनावर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, अमेरिका 66 संयुक्त राष्ट्र व गैर-संयुक्त राष्ट्र संस्थांचे सदस्यत्व कायम ठेवणे, त्यात सहभागी होणे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणे हे देशाच्या हिताविरुद्ध आहे.

दरम्यान अमेरिकेसोबत अनेक मुद्द्यांवर असलेल्या संवेदनशीलतेचा विचार करता, भारत सरकारने गुरुवारी या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र,आयएसए मधून अमेरिकेच्या माघारीचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारत या प्रकरणात अत्यंत सावधपणे पुढे जाण्याच्या भूमिकेत आहे. तो ना अमेरिकेला अतिरिक्त संधी देऊ इच्छित आहे, ना दबावाखाली झुकल्याचे चित्र निर्माण करू इच्छित आहे. तसेच, अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांची मोठी लोकसंख्या वास्तव्यास आहे, हेही भारतासाठी महत्त्वाचे घटक आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या आयएसए मधून बाहेर पडण्यामुळे संस्थेच्या दैनंदिन कार्यावर तात्काळ परिणाम होणार नसला, तरी तज्ज्ञांच्या मते अमेरिका सारख्या मोठ्या देशाच्या माघारीमुळे निधी उभारणीसमोरील आव्हाने नक्कीच वाढतील. याच दरम्यान आयएसएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेच्या माघारीनंतरही संस्था पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील. अल्पावधीतच आयएसए चे सदस्यत्व 121 पेक्षा अधिक देशांनी स्वीकारले आहे. दरम्यान, भारताने 2023 मध्ये ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स (GBA) या नावाने स्वच्छ इंधन क्षेत्रातील आणखी एक आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना स्थापन केली आहे. अमेरिकाही या संघटनेची सदस्य आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande