इस्रायलसोबत युद्धविरामाच्या अटीवर थेट शांतता चर्चेसाठी लेबनान तयार
बेरूत, 15 मार्च (हिं.स.)।लेबनानने संकेत दिले आहेत की तो इस्रायलसोबत थेट शांतता चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आधी युद्धविराम लागू होणे आवश्यक आहे. अहवालानुसार, ही पुढाकार अशा वेळी समोर आली आहे जेव्हा इस्रायलने लेबनानमध्ये २००६ च्या युद्धानंतरचा
इस्रायलसोबत युद्धविरामाच्या अटीवर थेट शांतता चर्चेसाठी लेबनान तयार


बेरूत, 15 मार्च (हिं.स.)।लेबनानने संकेत दिले आहेत की तो इस्रायलसोबत थेट शांतता चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आधी युद्धविराम लागू होणे आवश्यक आहे. अहवालानुसार, ही पुढाकार अशा वेळी समोर आली आहे जेव्हा इस्रायलने लेबनानमध्ये २००६ च्या युद्धानंतरचा सर्वात मोठा भू-अभियान सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

अहवालानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपले निकटवर्तीय सल्लागार रॉन डर्मर यांना लेबनानशी संबंधित कूटनीतिक प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. तर अमेरिकेच्या बाजूने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत ही चर्चा सुरू होऊ शकते आणि त्यासाठी पॅरिस किंवा सायप्रस ही संभाव्य ठिकाणे मानली जात आहेत.

दरम्यान, फ्रान्सकडून एका शांतता प्रस्तावाची चर्चा देखील समोर आली आहे. या प्रस्तावात युद्ध संपवण्यासाठी हिजबुल्लाचे निरस्त्रीकरण आणि लेबनानने इस्रायलला मान्यता देण्याच्या अटींचा उल्लेख असल्याचे सांगितले गेले होते. मात्र फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशा कोणत्याही प्रस्तावाचे अस्तित्व नाकारले आहे.

लेबनानचे संसदीय अध्यक्ष आणि अमल मूव्हमेंटचे नेते नबीह बेरी यांनी स्पष्ट केले की कोणतीही चर्चा सुरू होण्यापूर्वी युद्धविराम लागू करणे आवश्यक आहे. दरम्यान, पश्चिम आशियात लष्करी तणाव सतत वाढताना दिसत आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की अमेरिकन सैन्य इराणच्या लष्करी क्षमतांविरोधात आपले अभियान सुरू ठेवत आहे

दरम्यान, अहवालात असा दावा करण्यात आला आहे की एका इराकी प्रतिरोधक गटाने पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. या अहवालानुसार, इराकमधील एका अमेरिकन लष्करी तळावर हल्ल्यानंतर आग लागल्याचेही सांगितले गेले आहे. तसेच इराणच्या सशस्त्र दलांनी दावा केला आहे की त्यांनी आणखी चार ड्रोन पाडले असून आतापर्यंत पाडलेल्या ड्रोनची संख्या ११८ वर पोहोचली आहे.

दरम्यान, दक्षिण लेबनानमध्येही चकमकी सुरूच आहेत. माहितीनुसार, इस्रायली हवाई हल्ले आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याने अनेक गावांना लक्ष्य केले आहे. मेफदून आणि त्याच्या आसपासच्या भागांसह जवतर, यहमर आणि अर्नौन या शहरांमध्येही जोरदार गोळीबार झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande