सायानी गुप्ताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; iSAFF कॅनडात दुहेरी सन्मान
मुंबई, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। सायानी गुप्ता हिच्या अभिनय कारकिर्दीत अजून एक उल्लेखनीय गोष्टीची भर पडली असून फिल्म फेस्टिव्हल सीझनमध्ये तिने अजून एक पुरस्कार पटकावला आहे. अभिनय- दिग्दर्शिकेला इंटरनॅशनल साऊथ एशियान फिल्म फेस्टिवल कॅनडा कडून iSAFF लीडर
सायानी गुप्ताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; iSAFF कॅनडात दुहेरी सन्मान


मुंबई, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। सायानी गुप्ता हिच्या अभिनय कारकिर्दीत अजून एक उल्लेखनीय गोष्टीची भर पडली असून फिल्म फेस्टिव्हल सीझनमध्ये तिने अजून एक पुरस्कार पटकावला आहे. अभिनय- दिग्दर्शिकेला इंटरनॅशनल साऊथ एशियान फिल्म फेस्टिवल कॅनडा कडून iSAFF लीडरशिप इन फिल्म अवार्ड 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागेही आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला तिचा प्रवास अधोरेखित करतो. हा पुरस्कार सायानी गुप्ता साठी अजून मैलाचा दगड ठरला आहे.

फेस्टिव्हलच्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही खूप उत्सुकतेने सांगतो आहोत ha पुरस्कार आमच्या शॉर्ट फिल्म ला मिळाला आहे.जगभरात त्याला खूप प्रेम मिळतंय”

सायानी यहिच्या आनंदात आणखी भर पडली ती म्हणजे आसमानीला iSAFF येथे Excellence in Short Film Making Honourable Mention मिळाले आहे.

हा सन्मान औपचारिकरित्या iSAFF Honours Night & Red Carpet येथे प्रदान करण्यात आला. याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांना प्रदान करण्यात आलेल्या Harvard University SAA 'South Asian Person of the Year' व्यतिरिक्त, हा leadership in Eccellence in Films award सायानी यांचा सर्जनशील शक्ती म्हणून वाढता आंतरराष्ट्रीय ठसा आणि भारत व भारतीय कथाकथनाला जागतिक व्यासपीठावर नेण्याच्या त्यांच्या कार्याची दखल आहे.

आसमानीचे पुढील Canada screening IFFSA, Toronto येथे पार पडणार असून तिथे सायानी मुख्य पाहुणी असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande