डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ खोपोलीत ‘शटरडाऊन’
रायगड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। सात दिवसांच्या बालिकेच्या मृत्यूनंतर खोपोलीतील खासगी रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ खोपोली आणि खालापूर तालुका डॉक्टर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत दवाखाने
'Shutter-down' in Khopoli to protest against attacks on doctors.


'Shutter-down' in Khopoli to protest against attacks on doctors.


रायगड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। सात दिवसांच्या बालिकेच्या मृत्यूनंतर खोपोलीतील खासगी रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ खोपोली आणि खालापूर तालुका डॉक्टर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत दवाखाने बंद ठेवून निषेध नोंदवला.

मिळालेल्या माहितीनुसार, नवजात बालिकेचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बालिकेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात, तर रुग्णालय प्रशासनाने मारहाण व तोडफोडीबाबत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बालिकेचे शवविच्छेदन मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात आले असून, अंतिम वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

घटनेला चार दिवस उलटूनही हल्लेखोरांवर कठोर कारवाई न झाल्याचा आरोप करत डॉक्टरांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना वारंवार लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेमार्फत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.निषेधादाखल अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवून खासगी बाह्यरुग्ण विभाग आणि दवाखाने बंद ठेवण्यात आले.दरम्यान, दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी सुरू असून, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे खोपोली पोलिसांनी स्पष्ट केले. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि मारहाणीच्या घटनेतील जबाबदारी चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande