
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। मॉडेलिंग, अभिनय, स्क्रीनप्ले रायटर असा बहुआयामी प्रवास करत आता अभिनेत्री शीतल उपारे नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. एक भारतीय आंतरराष्ट्रीय अभिनेत्री, नाट्य कलाकार, दिग्दर्शक, पटकथा लेखिका आणि व्हॉइस-ओव्हर कलाकार असलेली शीतल लवकरच तिच्या नव्या प्रवासाला ती सुरुवात करणार असून इंडस्ट्रीत या आधी ती विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
शीतलने फक्त मॉडेलिंग न करता आपल्या देशाच प्रतिनिधित्व केलं आहे वर्ल्ड फिनाले मिस हेरिटेज सारख्या शो साठी तिने भारताच प्रतिनिधित्व केलं आहे. भारतासाठी दोन प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिल्या भारतीय तरुणी म्हणून देखील ती ओळखली जाते. ( मिस हेरिटेज इंटरनॅशनल दुसरी उपविजेती (2nd Runner-अप) ( मिस इंडिया प्रोग्रेस इंटरनॅशनल - विजेती)
शीतल काही काळ सिंगापूर एअरलाईन्स (SQ) मध्ये विमान कर्मचारी (केबिन क्रू) म्हणूनही कार्यरत होती पण तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका खाजगी जेट कंपनीतून केली आणि त्यानंतर सिंगापूरच्या राष्ट्रीय विमान कंपनीसोबत काम केले. भारताच गौरव वाढवत तिने 'मिस हेरिटेज इंटरनॅशनल' चा किताब जिंकला आणि नाटकांवरील प्रेमामुळे त्या चित्रपटसृष्टीकडे वळली आहे.
विविध नाट्यसंस्थांसोबत ५० हून अधिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या शीतलने 'पाषाण' (गिरीश कर्नाड), 'तथागत' आणि 'व्याकुल चांदण्या' यांसारख्या प्रमुख नाटकांत तिने भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या 'तारा द लॉक' (Tara the Lock) या आंतरराष्ट्रीय लघुपटात काम करून या लघुपटाची पटकथाही शीतल हिने लिहिली होती. तारा' (Tara) या चित्रपटाला इटली आणि जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळाले आहे तर या चित्रपटाने 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार' जिंकला आहे. सौंदर्य स्पर्धेनंतर तिने 'इंडियन प्रेमाचा लफडा' (IPL) या व्यावसायिक मराठी चित्रपटात काम केले जो डिसेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.
शीतलचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद असून लवकरच ती बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याचं कळतंय. अद्याप या नव्या प्रोजेक्ट बद्दलची माहिती गुलदस्त्यात असून लवकरच ती नवा काय प्रोजेक्ट करणार? कोण बडे कलाकार शीतल सोबत दिसणार ? हे समजेल
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर