
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत बलभीम महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या अफाट जिद्दीच्या, वेगाच्या आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या बळावर घवघवीत यश संपादन केले. दोन महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत खेळाडूंनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
4:100 मीटर रिले स्पर्धेत सुवर्णमय यश 4:100 मीटर रिले या सांघिक स्पर्धेत जमीर शेख, समर्थ राऊत, समर्थ घोडके आणि जैद सय्यद या खेळाडूंनी वेग, अचूक समन्वय, संघभावना आणि जिंकण्याची जिद्द यांचा सुरेख संगम साधत प्रतिस्पध्र्थ्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीने संघाच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत बहीरवाळ बाळू अंकुश याने आपल्या उत्कृष्ट धावण्याच्या कौशल्याच्या आणि चिकाटीच्या
जोरावर प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ. संतोष डुबल, आय. क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. अनिल चिंधे, प्रबंधक पी.पी.डावकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. जे.जी. तत्तापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis