
कोल्हापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर शाही दसरा महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित ‘कोल्हापूर चित्रनगरीची सफर’या उपक्रमाला नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज मंगळवारी सुमारे १ हजार ५०० नागरिक व पर्यटकांनी कोल्हापूर चित्रनगरीला भेट देऊन तेथील चित्रिकरणाचा अनुभव घेतला.
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये पाटील वाडा, बंगला, चाळ, मंदिर, वाडा, रेल्वे स्टेशन, जोतिबा सेट तसेच तीन स्टुडिओंसह विविध चित्रिकरण स्थळे आहेत. सध्या चित्रनगरीमध्ये ‘जुळली गाठ गं, ‘आई तुळजा भवानी’ आणि ‘थोडीसी उमिद थोडासा आसमान’या मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक व पर्यटकांना चित्रनगरीतील विविध सेट्स आणि चित्रिकरण प्रक्रिया जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar