रायगड - कबड्डीच्या वादातून पी.एन.पी. महाविद्यालयाबाहेर मारहाण; शिक्षकासह पाच जण जखमी
रायगड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) : नेहूली क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील वादातून वेश्वी येथील पी.एन.पी. महाविद्यालयाबाहेर मारहाणीची घटना घडली. या घटनेत शिक्षकासह चार विद्यार्थी आणि एका शिपायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
## कबड्डीच्या वादातून पी.एन.पी. महाविद्यालयाबाहेर मारहाण; शिक्षकासह पाच जण जखमी  **अलिबाग :** नेहूली क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील वादातून वेश्वी येथील पी.एन.पी. महाविद्यालयाबाहेर मारहाणीची घटना घडली. या घटनेत शिक्षकासह चार विद्यार्थी आणि एका शिपायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नेहूली क्रीडा संकुलात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेत पी.एन.पी. महाविद्यालयाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर वाद निर्माण झाला. या वादातून अष्टदा सूर्यकांत भगत हिने कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर विराज जुईकर याच्यासह २० ते २५ अनोळखी व्यक्तींनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जमाव जमवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या घटनेत शिक्षक तेजस मोहन म्हात्रे आणि विद्यार्थी साहिल अजित भगत, हर्ष श्रीदास म्हात्रे व हर्षित महेश पाटील जखमी झाले. तसेच महाविद्यालयाचे शिपाई कुणाल प्रभाकर भिंगे यांच्या पाठीवर दगड मारून दुखापत केल्याचा आरोप आहे. झटापटीत हर्षित पाटील याच्या गळ्यातील सोन्याची चेन हरवल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनास्थळी उपस्थित सायली नितेश म्हात्रे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.  घटनेप्रकरणी रात्री उशिरा अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हंबीर करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


रायगड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) : नेहूली क्रीडा संकुलात झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील वादातून वेश्वी येथील पी.एन.पी. महाविद्यालयाबाहेर मारहाणीची घटना घडली. या घटनेत शिक्षकासह चार विद्यार्थी आणि एका शिपायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नेहूली क्रीडा संकुलात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेत पी.एन.पी. महाविद्यालयाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर वाद निर्माण झाला. या वादातून अष्टदा सूर्यकांत भगत हिने कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर विराज जुईकर याच्यासह २० ते २५ अनोळखी व्यक्तींनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जमाव जमवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेत शिक्षक तेजस मोहन म्हात्रे आणि विद्यार्थी साहिल अजित भगत, हर्ष श्रीदास म्हात्रे व हर्षित महेश पाटील जखमी झाले. तसेच महाविद्यालयाचे शिपाई कुणाल प्रभाकर भिंगे यांच्या पाठीवर दगड मारून दुखापत केल्याचा आरोप आहे. झटापटीत हर्षित पाटील याच्या गळ्यातील सोन्याची चेन हरवल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनास्थळी उपस्थित सायली नितेश म्हात्रे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हंबीर करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande