शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी परभणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन
: ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव देण्याची मागणी परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकर्यांची कर्जमाफी करावी, कर्ज पुनर्गठन प्रक्रियेतील त्रुटी दूर करून पात्र शेतकर्यांना न्याय द्यावा, ऊस उत्पादकांना प्रतिटन किमान चार हजार रुपये भाव मिळावा, तसेच विशे
शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी परभणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन


: ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव देण्याची मागणी

परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

शेतकर्यांची कर्जमाफी करावी, कर्ज पुनर्गठन प्रक्रियेतील त्रुटी दूर करून पात्र शेतकर्यांना न्याय द्यावा, ऊस उत्पादकांना प्रतिटन किमान चार हजार रुपये भाव मिळावा, तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, या मागण्यांसाठी सोनपेठ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनानंतर नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धोंगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकर्यांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, कर्ज पुनर्गठनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच एसआयआर प्रक्रियेत कोणत्याही पात्र मतदाराच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली. या निवेदनावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष दत्ताराव कदम, तालुकाध्यक्ष रावसाहेब मोकाशे, प्रभाकरराव सिरसाठ, अब्दुल खदीर मोमीन, सुरेशकुमार लोढा, सुदर्शन कदम, सैफुल्ला सौदागर, नाशेर पठाण, अशोक सुरवसे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande