केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी परभणी दौऱ्यावर
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी (दि. १७)परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे शनिव
शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले परभणी दौऱ्यावर


परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी (दि. १७)परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे शनिवारी आळणी जि. धाराशिव येथून वाहनाने दुपारी २ वाजता सेलू तालुक्यातील हतनूर येथे आगमन होईल. तेथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करणार आहेत. दुपारी २.४५ वाजता वालूर ता. सेलू येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करतील. दुपारी ३.१५ वाजता परभणी येथील हॉटेल फर्न येथे आगमन व राखीव. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे ते दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर ते अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande