
: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे शुक्रवारी (दि. 16 ऑक्टोबर) परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे दुपारी 2.30 वाजता बीड येथून परभणीत आगमन होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या उपस्थितीत वसमत रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचाराची दिशा, पदवीधरांचे विविध प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातील पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेस सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय विजयराव गव्हाणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis