
मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : काही सर्वात मोठ्या कल्पना अगदी छोट्या वर्गखोल्यांमधून जन्म घेतात. शालेय प्रकल्पांपासून आणि रेखाटनांपासून ते नावीन्यपूर्ण शोधांपर्यंत, उद्योजकतेच्या महत्त्वाकांक्षेला वयाची कोणतीही मर्यादा नसते. शार्क टँक इंडिया 6चा भाग म्हणून यंग फाउंडर्स स्पेशलसाठी रजिस्ट्रेशन खुले झाले आहे. ज्यामुळे युवा उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय कल्पना शार्क्ससमोर सादर करण्यासाठी आणि आपल्या संकल्पनांचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पीपल ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम मित्तल म्हणाले, “मुलांमध्ये नैसर्गिक कुतूहल असतं आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची तीक्ष्णता व व्यापकता पाहून मी अनेकदा थक्क होतो. शार्क टँक इंडिया 6मधील यंग फाउंडर्स स्पेशल खूपच उत्साहवर्धक ठरणार आहे. उद्योजकतेची स्वप्नं पाहणाऱ्या या युवा संस्थापकांसाठी आव्हानांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याचं आणि त्यांच्या कल्पनांचं शक्यतांमध्ये रूपांतर करण्याचं हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.”
प्रोमो लिंक : https://youtu.be/F0YrCPT98Ik
रजिस्ट्रेशन लिंक : https://sharktank.sonyliv.com/youngfounder/
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी