रायगड - राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रायगड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत असून, स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता
Submit applications for State Drama Competition adjudication by October 25


रायगड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होत असून, स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हौशी मराठी, हिंदी व संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, मराठी एकांकिका आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धांसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.परीक्षण प्रक्रियेत अनुभवी कलाकारांचा सहभाग वाढवून त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धक कलाकार व नाट्यसंस्थांना मिळवून देणे, हा अर्ज मागविण्यामागील उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

इच्छुक व पात्र कलाकारांनी mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande