आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। नवरात्रीच्या मंगलमय पर्वात आई अंबाबाईच्या भक्तीचा स्वर घेऊन ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे सुंदर पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांच्या भेटीला आले आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा आणि भक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रीत
आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। नवरात्रीच्या मंगलमय पर्वात आई अंबाबाईच्या भक्तीचा स्वर घेऊन ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे सुंदर पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांच्या भेटीला आले आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा आणि भक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रीत या गीताच्या माध्यमातून अंबाबाईच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा सुरेल अनुभव रसिकांना घेता येणार आहे. पारंपरिक लोकगीताला नव्या संगीताची जोड देणारे हे गीत देवीच्या भक्तांसाठी भक्तिरसाची अनुभूती देणारे ठरत आहे.

या गीताला दुर्गेश काळे यांचा स्वर आणि संगीत लाभले असून गीताचे बोल पारंपरिक आहेत. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर हे या गीताचे निर्माते असून आदित्य पाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभलेल आहे. साईरत्न एंटरटेनमेंटच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गीत प्रदर्शित झाले आहे.

निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर म्हणतात, “नवरात्री हा आई अंबाबाईच्या भक्तीचा आणि शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. या मंगलमय पर्वात ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ हे पारंपरिक लोकगीत नव्या संगीताच्या रूपात रसिकांसमोर आणताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या लोकपरंपरेतील अशी भक्तिगीते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत आणि पुढील पिढीनेही हा सांस्कृतिक वारसा जपावा, हीच आमची इच्छा आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande