तृतीयपंथीयांची कुचंबणा थांबणार; बीड विभागातील ११ बसस्थानकांवर उभारणार स्वतंत्र स्वच्छतागृहे
बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने तृतीयपंथीयांना नेहमीच मानहानी आणि कुचंबणेला सामोरे जावे लागते. त्यांच्या या दुर्लक्षित समस्येची अखेर शासनाने दखल घेतली आहे. बीड विभागातील ११ बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्
बीड बस स्थानक


बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने तृतीयपंथीयांना नेहमीच मानहानी आणि कुचंबणेला सामोरे जावे लागते. त्यांच्या या दुर्लक्षित समस्येची अखेर शासनाने दखल घेतली आहे. बीड विभागातील ११ बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शासनाने २६ लाख ४० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

परिवहन विभागाने १४ ऑक्टोबरला हा शासन निर्णय जारी केला. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून प्रत्येकी २ लाख ४० हजार रुपये खर्चून ही स्वच्छतागृहे उभारली जातील. या संवेदनशील आणि स्तुत्य निर्णयामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयांची मोठी गैरसोय दूर होणार असून, त्यांना हक्काचा सन्मान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande