वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके
नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। - नाशिकच्या ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके ह्या दोन खेळाडूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २६ ऑक्टोबरपासून सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वें
Nashik's Ishwari Sawkar


Nashik's Ishwari Sawkar


नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

- नाशिकच्या ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके ह्या दोन खेळाडूंची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २६ ऑक्टोबरपासून सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत या दोघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी देखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघात महाराष्ट्रातर्फे तसेच पश्चिम विभागाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

सलामीची फलंदाज ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. ईश्वरीची गेली काही वर्षे , महिलांच्या १९ तसेच २३ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील हाय परफॉरमन्स शिबिरासाठी निवड होत आली आहे. २०२२ मध्ये महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. त्या स्पर्धेत श्रीलंका व वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चांगली कामिरी केल्याने ईश्वरीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात नियमितपणे निवड होत आहे.

नाशिक जिल्हा महिला वरिष्ठ संघाची कर्णधार प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, प्रतिनिधित्व करतांना प्रियांकाने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती तसेच २०१८-१९ च्या हंगामात ,टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते.

सुरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे साखळी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत - २६ ऑक्टोबर-आसाम, २७ ऑक्टोबर-कर्नाटक, २९ ऑक्टोबर -चंदीगड, ३१ ऑक्टोबर - छत्तीसगड १ नोव्हेंबर -बंगाल व ५ नोव्हेंबर-गोवा.

ईश्वरी सावकार व प्रियंका घोडकेच्या या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघींचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande