भव्य धम्म मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे -पि. जे. वानखडे
अकोला, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्य मानुन देशातील वंचित बहुजन समाजाला स्वतंत्रपणे, स्वाभीमानाने, समृद्ध जीवन जगता यावे, त्यांना न्याय हक्क मिळावा, समाजात सकारात्मक बदल घडून यावा म्हणुन अँड. बाळासाहेब आं
Photo


अकोला, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्य मानुन देशातील वंचित बहुजन समाजाला स्वतंत्रपणे, स्वाभीमानाने, समृद्ध जीवन जगता यावे, त्यांना न्याय हक्क मिळावा, समाजात सकारात्मक बदल घडून यावा म्हणुन अँड. बाळासाहेब आंबेडकर निरंतर कष्ट घेत आहेत. आपल्या कौंटूबिक तथा वैयक्तीक सुखाचा त्याग करुन संपूर्ण कुटुंब बहुजन समाजासाठी जीवन समर्पित करीत आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात सन 1984 पासून म्हनजे गेल्या 42 वर्षा पासून अकोला शहरात अशोक विजया दशमीच्या दुस-या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भव्य धम्म मेळावा साजरा केल्या जातो. या धम्म मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जनतेला संबोधीत करतात. त्यांचे संबोधन समाजासाठी उर्जा प्रेरणा तथा नवसंजीवनी असते. संपूर्ण बहुजन समाज त्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड, अकोला या ठिकाणी भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आधाडी, महिला आघाडी, युवक आधाडी, विद्वत सभा, संम्यक विद्यार्थी आंदोलन कष्ठ घेत आहेत. या धम्म मेळाव्यामुळे जनसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपल्या मजुरीची पर्वा न करता मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारीला लागले आहेत.

दिनांक 21 ऑक्टोबरला दुपारी 12.00 वा. रेल्वेस्टेशन चौक अकोला येथून मिरवणूकीस सुरवात होईल. शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टॅन्ड मानेक टॉकीज, मंगलदास मार्केट, सिटी कोतवाली, गांधी चौक, बसस्टँड टॉवर मार्गे मिरवणुक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येवून सायंकाळी 6.00 वाजता धम्म मेळाव्याला प्रारंभ होईल. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध आणि गाजलेल्या कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. या मिरवणूकीमध्ये जिल्हयातील आखाडे, लेझीम पथक, देखावे पारंपारीक, वाद्य, बैन्डपथक, घोडे, समता सैनिक दलाचे पथ संचालन खास आकर्षण असते.

श्रध्देय बाबासाहेब आंबेडकर सजवलेल्या धम्म रथावर आरुढ होवून मिरवणूकीचे नेतृत्व करीत असतात. शहरात मिरवणूकी दरम्यान ठिकठिकाणी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे विविध जाती-समुदाय, व्यापारी, प्रतिष्ठीत मंडळी कडून भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येते. प्रचंड मिरवणूक व भव्य-दिव्य धम्म मेळावा शिस्तबध्द व शांततेत' पार पडावा म्हणून 20 समित्यांचे गठन करण्यात आले असून युद्धस्तरावर त्यांचे काम सुरु आहे. प्रत्येक समिती प्रमुखाची नेमणूक करुन त्यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समाजातील लोक स्वयं प्रेरणेने सहभागी होवून तन-मन-धनाने सहकार्य करीत आहेत. भारतीय बौध्द माहासभेचे संपूर्ण पदाधिकारी यांनी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.

हा धम्म मेळावा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष पी. जे. वानखडे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या मेळाव्याला प्रा. अंजलीताई आंबेडकर, डॉ. भिमराव आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य मार्गदर्शक श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. श्रध्देय बाळासाहेब आंबेडेकर यांचे मार्गदर्शन म्हणजे उर्जा असते. वर्षभरासाठी पुरणारी शिदोरी असते, वैचारीक, सामाजिक, राजकीय मंडळी त्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत असतात या भव्य धम्म मेळाव्याला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande