कॅनडाच्या लष्करी तळावर आग; चार सैनिकांचा मृत्यू
ओटावा (कॅनडा), 19 ऑक्टोबर (हिं.स.)। कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कॅनेडियन फोर्सेस बेस वेनराइट या लष्करी तळावर शनिवारी लागलेल्या आगीत चार सैनिकांचा मृत्यू झाला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. या दुर्घटनेत अन्य
Canada Military base 4 death


ओटावा (कॅनडा), 19 ऑक्टोबर (हिं.स.)। कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कॅनेडियन फोर्सेस बेस वेनराइट या लष्करी तळावर शनिवारी लागलेल्या आगीत चार सैनिकांचा मृत्यू झाला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला. या दुर्घटनेत अन्य अनेक जण गंभीररीत्या भाजले असून, त्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, अल्बर्टाच्या प्रीमियर डॅनियल स्मिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी किमान १९ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कॅनेडियन फोर्सेस बेस वेनराइट येथून अल्बर्टातील चार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. मृत सैनिकांमध्ये सार्जंट मॉर्गन वोंग, शॉन फॅरेल, एडन गोल्डिंग आणि हेडन लाइकेमार्क यांचा समावेश आहे.

संरक्षणमंत्री डेव्हिड मॅकगिन्टी म्हणाले, “लष्करी तळावर घडलेल्या एका घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दुःख होत आहे.” प्रथम कॅनेडियन डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल वेड रटलँड यांनी रविवारी सांगितले की, प्रशिक्षण सरावादरम्यान गवताला लागलेली आग वेगाने पसरली. आग लागण्यामागील प्राथमिक कारणांचा तपास सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचेही रटलँड यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande