भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या कथेवर आधारित ‘उडता तीर’ चित्रपटावर नेपाळमध्ये बंदी
काठमांडू, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उडता तीर’ या चित्रपटाच्या नेपाळमधील प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आकाश कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट शुक्रवारपासून चित्रपटगृहां
Nepal Banned Udta Teer Indian


काठमांडू, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उडता तीर’ या चित्रपटाच्या नेपाळमधील प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. आकाश कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट शुक्रवारपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता.

नेपाळच्या माहिती तथा संचार मंत्रालयाने चित्रपट वितरण कंपनी नॅशनल सिने ग्रुपला पत्र लिहून या चित्रपटाला नेपाळमध्ये प्रदर्शनाची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे कळवले आहे. मंत्रालयाच्या श्राव्य-दृश्य तथा प्रसारण विभागाने सांगितले की, या चित्रपटात अशा प्रकारची विषयवस्तू आढळली आहे, जी निर्माण, प्रदर्शन आणि वितरण अधिनियम, २०२६ च्या कलम ८ (३) अंतर्गत प्रतिबंधित आहे. या तरतुदीनुसार चित्रपटाला सार्वजनिक प्रदर्शनाची परवानगी देता येत नाही.

या चित्रपटात अप्रत्यक्षपणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची कथा मांडण्यात आली आहे. याच कारणामुळे केंद्रीय चित्रपट तपास समितीने त्याच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घातली आहे. नेपाळचे चित्रपट लेखक आणि समीक्षक सामिप्यराज तिमिल्सिना म्हणाले, “एखाद्या अन्य देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या चित्रपटांना रोखण्याची तरतूद आहे. कारण दोन्ही देश आपले मित्रराष्ट्र आहेत.”

त्यांनी सांगितले की, कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय भावना किंवा तेथील समुदायावर थेट परिणाम करणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची तरतूद अस्तित्वात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande