मोठ्या पडद्यावर झळकावं हे स्वप्न 'या' नवीन चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण - अक्षया नाईक
मुंबई, 20 ऑक्टोबर, (हिं.स.)। नऊ दिवसांचा उत्सव संपूर्ण होऊन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सगळेच त्यांचा आयुष्यातील सोनेरी क्षण साजरे करतात आणि अश्यातच अक्षया नाईकने तिच्या सोनेरी क्षण साजरे करून तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल खास भावना व्यक्त करत
अकया्ष


मुंबई, 20 ऑक्टोबर, (हिं.स.)। नऊ दिवसांचा उत्सव संपूर्ण होऊन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सगळेच त्यांचा आयुष्यातील सोनेरी क्षण साजरे करतात आणि अश्यातच अक्षया नाईकने तिच्या सोनेरी क्षण साजरे करून तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल खास भावना व्यक्त करते.

“लग्न आणि बरचं काही” हा चित्रपट येणाऱ्या २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अक्षया खास भूमिका साकारताना दिसणार आहे. तिचा हा पहिला वहिला चित्रपट असून हा चित्रपट तिच्या आयुष्यातला सोनेरी क्षण नक्कीच आहे.

अक्षयाने हिंदी टेलिव्हिजन मधून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि सुंदरा घरघरात पोहचली पुढे अनेक वेगवेगळ्या भूमिका मधून तिने प्रेक्षकांना मोहित केलं. “तस्करी” मधून नेटफ्लिक्स सारख्या बड्या ओटीटी माध्यमातून तिने बॉलिवूडला भुरळ घातली आणि आता पहिल्यांदा ती मराठी चित्रपटात पदार्पण करताना दिसणार आहे. “लग्न आणि बरचं काही” हा चित्रपट तिचा पहिला मराठी चित्रपट असून या चित्रपटातील तिची भूमिका ही नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.

अक्षया या बद्दल बोलताना सांगते “ कधीतरी आपण मोठ्या पडद्यावर झळकावं हे प्रत्येक कलाकाराच स्वप्न असत आणि हेच स्वप्न माझं देखील होत आणि आज हे स्वप्न या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होतंय. उत्तम कलाकार, स्त्री फळी असलेला चित्रपटाचा कणा हे सगळंच खूप कमाल आहे आणि आपण अश्या एका चित्रपटाचा भाग होतंय हे भाग्य आहे अस म्हणणं वावगं ठरणार नाही”

येणाऱ्या काळात अक्षया अजून बहुआयामी भूमिका करताना दिसणार असून २३ ऑक्टोबर ला ती लग्न आणि बरचं काही चित्रपटात खास भूमिका साकारताना दिसणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande