

* प्रति समभाग किंमतपट्टा ₹ १,५८५ ते ₹ १,६६५ निश्चित
मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : EAAA इंडिया ऑलटरनेटीव्हज लिमिटेडने आपल्या पहिल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी (आयपीओ) प्रति समभाग ₹ ५/- दर्शनी मूल्य असलेल्या समभागांसाठी ₹ १,५८५ ते ₹ १,६६५ असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (“आयपीओ” किंवा “ऑफर”) सबस्क्रिप्शनसाठी सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होईल आणि बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ९ समभाग आणि त्यानंतर ९ समभागांच्या पटीत बोली (Bid) लावू शकतात.
₹ ५ दर्शनी मूल्य असलेला हा आयपीओ प्रवर्तक – एडेलवाईस सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ₹ १,२०० कोटींपर्यंतचा ऑफर-फॉर-सेल (OFS) आहे.
२००८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ३० जून २०२६ पर्यंत ₹ ९,५३,४४८.७८ दशलक्ष म्हणजेच ₹ ९५,३४४.८ कोटींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेसह (AUM) आणि दीर्घकालीन भांडवल व्यवस्थापनाच्या १७ वर्षांहून अधिक अनुभवासह (स्रोत - केअर रिपोर्ट) भारतातील व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (AUM) बाबतीत आघाडीच्या ऑलटरनेटीव्ह प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
कंपनीच्या प्रमुख व्यवसाय घटकांमध्ये रिअल ॲसेट्सचा (Real Assets) समाविष्ट आहे, जे इक्विटी, क्वासी-इक्विटी आणि डेट उपकरणांच्या मिश्रणात गुंतवणूक करते; आणि प्रायव्हेट क्रेडिट (Private Credit), जे प्रामुख्याने चांगल्या जोखीम-समायोजित परताव्यासाठी (Risk-adjusted returns) डेट किंवा कन्व्हर्टिबल डेट उपकरणे व सेक्युलर उपकरणांमध्ये गुंतवणूक करते. तिची संपूर्ण मालकीची उपकंपनी, सेकुरा इंडिया मॅनेजमेंट लिमिटेड (सेकुरा), ही तिच्या मालमत्ता संचालन आणि व्यवस्थापन टीमचा भाग आहे आणि तिचे ऑपरेशन्स, मेंटेनन्स, मॉनिटरिंग, कार्यक्षमता सुधारणा व टर्नअराउंड मॅनेजमेंट यासह विविध व्यवसाय घटकांना समर्थपणे पाठबळ देते.
कंपनी ही एक अनुभवी संस्था असून, जागतिक आणि देशांतर्गत संस्थात्मक ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला सेवा पुरवते आणि तिच्या सर्व व्यवसाय घटकांमध्ये भारत-केंद्रित निधींचे व्यवस्थापन करते. ३० जून २०२६ पर्यंत, कंपनीचा FPAUM एकूण ₹ ४,८६,२३१.७६ दशलक्ष म्हणजेच ₹ ४८,६२३.१ कोटी होता. गेल्या तीन आर्थिक वर्षांत, तिचा FPAUM आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अंदाजे २३.४३% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने (CAGR) वाढून ₹ ४,४७,१०४.४२ दशलक्ष म्हणजेच ₹ ४४,७१०.४ कोटी झाला आहे. तिचे बहुतेक मोठे फंड्स त्यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या मालिकेत आहेत किंवा प्रवेश करत आहेत आणि कंपनी या सर्व मालिकांमध्ये सातत्याने भांडवल उभारणीस यशस्वी ठरली आहे.
गेल्या तीन आर्थिक वर्षांत आणि ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने एकूण ₹ ४,७५,२६२.५० दशलक्ष किंवा ₹ ४७,५२६.२ कोटींचे भांडवल वचनबद्धतेद्वारे (Capital commitment) गोळा केले, ₹ ३,८२,२९३.९९ दशलक्ष किंवा ₹ ३८,२२९.३ कोटींची गुंतवणूक तैनात (Deployed) केली आणि ₹ ३,१२,३२९.४० दशलक्ष किंवा ₹ ३१,२३२.९ कोटींची गुंतवणूक प्राप्त (Realized) केली. तिच्या बहुतांश निधींची वेगवेगळ्या बाजार चक्रांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याची नोंद आहे.
३० जून २०२६ पर्यंत, तिने व्यवस्थापित केलेल्या निधींद्वारे जागतिक स्तरावर आणि भारतात १,४९३ पुनरावृत्ती ग्राहक (तिच्या एकापेक्षा जास्त निधीमध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक) आणि १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२६ दरम्यान जोडलेल्या ८,८०० ग्राहकांसह ११,००९ ग्राहकसंबंध (Client relationships) जोडले होते. ३० जून २०२६ पर्यंत, तिचे AUM च्या ७७% भाग पुनरावृत्ती ग्राहकांनी केलेल्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेचा समावेश होता.
कंपनीकडे वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग आहे - ३० जून २०२६ पर्यंत तिच्या AUM पैकी अंदाजे ४९.३२% हिस्सा पेन्शन फंड, विमा कंपन्या, बँका इत्यादींसह संस्थात्मक ग्राहकांचा आहे. याव्यतिरिक्त, ३० जून २०२६ पर्यंत, तिचा ग्राहकवर्ग भारत, उत्तर अमेरिका आणि युरोपसह जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
कंपनीची उपस्थिती मुंबई, नवी दिल्ली, गिफ्ट सिटी (GIFT City) आणि सिंगापूर येथे आहे. ३० जून २०२६ पर्यंत, तिच्या गुंतवणूक पथकात ८५ अनुभवी व्यावसायिकांचा समावेश होता. शिवाय, कंपनीने सर्वसमावेशक जोखीम व्यवस्थापन आराखडा (Risk Management Framework) लागू केला आहे.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत.
हा इश्यू सेबी ICDR नियमांनुसार बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जारी केला जात आहे, ज्यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) ५०% पेक्षा जास्त हिस्सा असणार नाही, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) १५% पेक्षा कमी हिस्सा असणार नाही आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (RIIs) ३५% पेक्षा कमी असणार नाही, इतका भाग राखीव ठेवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी