
नवी दिल्ली , 22 ऑक्टोबर (हिं.स.)। फ्रान्समध्ये सुरू असलेली आंदोलने आणि त्यानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी लक्षात घेता, भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी प्रवासविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांद्वारे भारतीय नागरिकांना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच ज्या परिसरात आंदोलने सुरू आहेत, अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. तसेच फ्रान्समधील स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या निर्देशांचे आणि सूचनांचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भारतीय नागरिक पॅरिसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधू शकतात. यासाठी दूतावासाने दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता जारी केला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी तपशील: भारतीय दूतावास, पॅरिस, दूरध्वनी: +33 6 48 34 00 63, ई-मेल: cons.paris@mea.gov.in , भारताचे महावाणिज्य दूतावास, मार्सेल दूरध्वनी: +33 7 43 16 25 59, ई-मेल: cgo.marseille@mea.gov.in
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode