
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारातही दिसून येत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सराफा बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे १,५५० रुपयांपासून १,७०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही प्रति किलोग्रॅममागे ५ हजार रुपयांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली आहे.
किमतींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,३७० ते १,४४,५२० रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३२,३४० ते १,३२,४९० रुपयांच्या दरम्यान आहे. चांदीच्या दरातही घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम २,२४,९०० रुपयांवर आला आहे.
दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,५२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,४९० रुपये नोंदवण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४४,३७० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३२,३४० रुपयांना विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव १,४४,४२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,३९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.
या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४४,३७० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३२,३४० रुपयांना विकले जात आहे. कोलकातामध्येही २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,३७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,३४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४४,४२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३२,३९० रुपये आहे.
जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४४,५२० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३२,४९० रुपयांना विकले जात आहे. पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,४२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,३९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,४४,५२० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,३२,४९० रुपयांना विकले जात आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा येथील सराफा बाजारांमध्येही आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. या तीन राज्यांच्या राजधानी असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,३७० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांमधील सराफा बाजारांत २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३२,३४० रुपयांना विकले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule