
मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हिने ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ ही आपली पहिली सर्वसामान्य ग्राहकांसाठीची सीएनजी प्रवासी कार बाजारात आणली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे सीएनजी गाड्यांमधूनही वेगवान आणि उत्साही ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो, हे दिसून येईल. या गाडीत टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारच्या इंधनांवर हे इंजिन ८२ किलोवॅट शक्ती आणि २०० एनएम टॉर्क देते. ही गाडी प्रति किलो सीएनजीमध्ये २४.७ किलोमीटरचे प्रमाणित मायलेज देते. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद कायम ठेवून इंधनावरील खर्च कमी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळतो. ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मध्ये केवळ सीएनजीची बचतच नाही, तर टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी, आकर्षक डिझाइन, प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता यांचाही समावेश आहे. आकर्षक किमतीत उपलब्ध असलेली ही गाडी सीएनजी एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे.
‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे एसयूव्ही खरेदी करणे अधिक ग्राहकांना शक्य होणार आहे. विशेषतः पहिल्यांदाच एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या आणि अधिक शक्तिशाली इंजिन व आधुनिक सुविधांची अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीच्या सुरुवातीच्या प्रकारातही २६.०३ सेंटीमीटरची एचडी टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, मागील सीटसाठी एसी व्हेंट्स आणि ६०:४० प्रमाणात विभागता येणारी मागील सीट अशा प्रीमियम सुविधा आहेत. साहजिकच, सीएनजीमुळे इंधनावरील खर्च कमी होतोच, शिवाय ‘एक्सयूव्ही ३एक्सओ’ची खास रचना, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील सोयीही अनुभवता येतात. ड्रायव्हिंगच्या आनंदात कोणतीही तडजोड करावी लागत नाही.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष डॉ. वेलुसामी आर. म्हणाले, “’एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’चे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही तडजोड न करता उत्तम अनुभव देणे. आजच्या ग्राहकांना ‘एसयूव्ही’मधील प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव हवा असतो. त्याच वेळी सीएनजीमुळे इंधनावरील खर्चही कमी व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असते. या गाडीत तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क, टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी आणि प्रभावी मायलेज यांचा संगम आहे. त्यामुळे ‘सीएनजी’ची किफायतशीरता आणि एसयूव्ही चालवण्याचा आनंद या दोन्ही गोष्टी एकाच गाडीत मिळतात. ‘सीएनजी एसयूव्ही’कडून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही गाडी नवा मापदंड ठरवेल.”
मुख्य वैशिष्ट्ये
टर्बो इंजिनची दमदार कामगिरी व ड्रायव्हिंगचा उत्साह – सीएनजी व पेट्रोल, दोन्ही प्रकारांत
कामगिरीत कोणतीही तडजोड नाही : १.२ लिटरचे एमस्टॅलियन टीसीएमपीएफआय टर्बोचार्ज्ड इंजिन हे सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांत ८२ किलोवॅट शक्ती आणि २०० एनएम टॉर्क देते. टर्बोचार्जरची कार्यपद्धती आणि इंजिनचे इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्रणा (ईसीयू) यांची योग्य जुळवणी केल्यामुळे इंधनाचा प्रकार कोणताही असला, तरी इंजिनची शक्ती आणि टॉर्क समान राहतात. त्यामुळे प्रत्येक प्रवासात एक्सयूव्ही ३एक्सओची दमदार कामगिरी आणि ड्रायव्हिंगचा आनंद अनुभवता येतो.
या श्रेणीतील सर्वाधिक टॉर्क : भारतातील सीएनजी प्रवासी गाड्यांमध्ये ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’चा २०० एनएम टॉर्क सर्वोत्तम आहे. १,५०० ते ३,५०० आरपीएम या इंजिनच्या वेगमर्यादेतही हा टॉर्क उपलब्ध होतो. त्यामुळे गाडी वेगाने पुढे जाते. शहरातील रस्त्यांवर तसेच महामार्गावरही गाडी चालवणे सहज आणि आत्मविश्वासपूर्ण होते.
वेगाने पकडते गती : सीएनजीवर चालताना ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ला ताशी ० ते ६० किलोमीटर वेग गाठण्यासाठी ४.९ सेकंद, तर ताशी ० ते १०० किलोमीटर वेग गाठण्यासाठी ११.८ सेकंद लागतात.
अधिक अंतर कापा, ड्रायव्हिंगचा आनंद घ्या.
मायलेज आणि कामगिरी यांचा उत्तम मेळ : या गाडीचे प्रमाणित मायलेज प्रति किलो सीएनजीमागे २४.७ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च कमी होतो. त्याच वेळी, एक्सयूव्ही ३एक्सओकडून अपेक्षित असलेली टर्बो इंजिनची दमदार कामगिरीही अनुभवता येते.
सीएनजी आणि पेट्रोलचा सहज वापर : चालकाला सीएनजी किंवा पेट्रोल यांपैकी कोणत्याही इंधनावर गाडी चालवता येते. सीएनजी कमी झाल्यास गाडी आपोआप पेट्रोलवर चालू लागते. त्यामुळे प्रवासात खंड पडत नाही आणि ड्रायव्हिंगचा आनंद कायम राहतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर