
रत्नागिरी, 24 ऑक्टोबर, (हिं.स.) । कोकण मराठी साहित्य परिषदेची राजापूर शाखा आणि ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ नोव्हेंबर रोजी ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
ओणीतील नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी ओणी पंचक्रोशी बालकुमार साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता सुप्रभा वाचनालय ते नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत पुस्तक दिंडी काढली जाणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. संमेलनाचे अध्यक्षपद कणकवलीचे सुप्रसिद्ध कवी अजय कांडर भूषविणार असून कोमसापच्या राजापूर शाखेचे वासुदेव तुळसणकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहे. कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून उद्घाटन संत्राचे सूत्रसंचालन
बालसाहित्यिक करणार आहे.
लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात दुपारी १२ वाजता बालसाहित्यिक मदन हजेरी मुलाखत प्राचार्य डॉ. राजाराम राठोड आणि सौ. मुग्धा कुळ्ये घेणार आहेत.
कविसंमेलन दुपारी २ वाजता पार पडणार असून निवडक १५ शालेय विद्यार्थी त्यात सहभागी होतील. निवेदन प्रज्ञेश देवस्थळी करतील. दुपारी पावणेतीन वाजता विद्यार्थ्यांचे निवडक दहा संघ प्रसिद्ध कवितांचे गायन करणार असून त्या सत्राचे निवेदनसमीर देशपांडे करणार आहेत. संमेलनाचा समारोप दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी