दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम अदा करा : भाजपचे उत्कर्ष वरपुडकर यांची परभणी जिल्हाधिकार्यांकडे मागणी
परभणी, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि अनियमित पावसामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या अग्रीम मदतीसोबतच पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी अदा करावी. तसेच, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्य
दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम अदा करा : भाजपचे उत्कर्ष वरपुडकर यांची परभणी जिल्हाधिकार्यांकडे मागणी


परभणी, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि अनियमित पावसामुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या अग्रीम मदतीसोबतच पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी अदा करावी. तसेच, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचे बंद झालेले रेशन पात्रतेनुसार पुन्हा सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्कर्ष विजयराव वरपुडकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.परभणी जिल्ह्यातील शेतकरी विविध नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पीक नुकसानीमुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, आगामी हंगामासाठी बियाणे, खते आणि अन्य कृषी निविष्ठांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या अग्रीम मदतीसोबतच पात्र शेतकर्यांच्या पीक विम्याची रक्कमही विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित विमा कंपन्या आणि प्रशासकीय यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी वरपुडकर यांनी केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या काही संचालकांचे रेशन बंद झाल्यामुळे संबंधित संचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणार्या अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून रेशन बंद होण्यामागील कारणे स्पष्ट करावीत. केवळ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद झाले असल्यास, लागू नियम व पात्रतेनुसार ते पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या दोन्ही बाबी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वरपुडकर यांनी निवेदनातून केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande