जॉर्डनमधील चर्चवरील हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। जॉर्डनमधील कराक शहरात एका चर्चवर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधातील आपली कटिबद्धता शनिवारी पुन्हा अधोरेखित केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुस
INDIA JORDAN ATTACK condemns


नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। जॉर्डनमधील कराक शहरात एका चर्चवर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधातील आपली कटिबद्धता शनिवारी पुन्हा अधोरेखित केली.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जॉर्डनमधील कराक येथे २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति भारताने तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “भारत या निंदनीय हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करतो.”

या कठीण काळात भारताने जॉर्डन सरकार आणि तेथील मैत्रीपूर्ण जनतेप्रति एकजूट व्यक्त केली. तसेच दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध आणि त्याच्या सर्व अभिव्यक्तींविरोधात लढा देण्याच्या आपल्या दृढ कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande