वाराणसीमध्ये रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते नवीन गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग सुविधेचे होणार उद्घाटन
वाराणसीतील नमो घाटावर पंतप्रधान ''वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026'' ची करणार पाहणी नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑक्टोबर 2026 रोजी उत्तर प्रदेशला भेट देतील. सकाळी 11 च्या सुमारास, पंतप्रधान वाराणसीमध्ये नवीन तय
PM Varanasi inaugurate garment manufacturing facility


वाराणसीतील नमो घाटावर पंतप्रधान 'वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026' ची करणार पाहणी

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑक्टोबर 2026 रोजी उत्तर प्रदेशला भेट देतील. सकाळी 11 च्या सुमारास, पंतप्रधान वाराणसीमध्ये नवीन तयार कपडे शिवणाऱ्या (गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग) सुविधेचे उद्घाटन करतील. दुपारी 1 च्या सुमारास, ते मुख्य अतिथी म्हणून वाराणसीतील नमो घाटावर 'वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026' ची पाहणी करतील.

पंतप्रधान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अरविंद लिमिटेडच्या नवीन तयार कपडे उत्पादन सुविधेचे उद्घाटन करतील. ही सुविधा भारतातील वस्त्रोद्योग आणि परिधान उत्पादन परिसंस्था मजबूत करण्याच्या तसेच या क्षेत्रातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

आधुनिक उत्पादन पद्धतींवर भर देणारी ही सुविधा विशेषतः महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल आणि या क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीत योगदान देईल. हे उद्घाटन औद्योगिक गुंतवणूक आणि उत्पादन-केंद्रित विकासाचे केंद्र म्हणून उत्तर प्रदेशची वाढती भूमिका देखील अधोरेखित करत आहे. जागतिक ग्राहकवर्ग असल्यामुळे, वाराणसीत तयार झालेली उत्पादने जगभरात कशा प्रकारे पोहोचतील याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्यत्वे महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रम असल्याने, हा महिला-प्रणित विकासाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.

पंतप्रधान वाराणसीतील नमो घाटावर 'वायुसेना दिन हवाई प्रात्यक्षिक-2026' या हवाई प्रात्यक्षिकांची पाहणी करतील. हा कार्यक्रम भारतीय हवाई दलाच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जाणार असून तो 'विंग्स ओव्हर गँजेस' या संकल्पनेवर आधारित आहे.

या हवाई प्रात्यक्षिकामध्ये तेजस, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) प्रचंड, सुखोई-30MKI आणि राफेल यांसारख्या लढाऊ विमानांसह मालवाहतूक करणाऱ्या विमानांचाही समावेश असेल. मोहिमांमधील संयुक्तता प्रदर्शित करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराची विमानेही यामध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमात सूर्य किरण एरोबॅटिक टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमसह भारतीय हवाई दलाच्या प्रमुख प्रात्यक्षिक टीम्स सहभागी होतील. या प्रात्यक्षिकामधून अचूक उड्डाण, समन्वय आणि परिचालनामधील उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले जाईल .

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande