बांगलादेचा वेगवान गोलंदाज नाहिद राणा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
ढाका, 25 ऑक्टोबर (हिं.स.)वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज नाहिद राणा दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची दुखापत इतकी गंभीर आहे की, नो
नाहिद राणा


ढाका, 25 ऑक्टोबर (हिं.स.)वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज नाहिद राणा दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची दुखापत इतकी गंभीर आहे की, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या सहभागाबद्दलही शंका आहे. राणाच्या खांद्याला लॅब्रम टियर झाल्याचे निदान झाले असून, त्याला पुनर्वसन उपचार घ्यावे लागणार आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) राणाच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. ऑस्ट्रेलियातील तपासणीनंतर त्याच्या दुखापतीचे खरे कारण समोर आले. बांगलादेशच्या १५ सदस्यीय संघात राणाचा समावेश करण्यात आला नाही. आणि आता हे स्पष्ट झाले आहे की तो वेस्ट इंडिजविरुद्धची संपूर्ण कसोटी मालिका मुकणार आहे. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी २८ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत राणा पूर्णपणे बरा होईल का, याबाबत खात्री देता येणार नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकेल की नाही, हे त्याच्या प्रकृतीत किती लवकर सुधारणा होते, यावर अवलंबून असेल. जर तो दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे बरा झाला नाही, तर तो कदाचित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल.

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका २८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर बांगलादेश संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. या दौऱ्याची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande