महाराष्ट्र - झारखंड रणजी ट्रॉफी : तनय संघवीची पदार्पणातच प्रभावी गोलंदाजी; पहिल्या डावात ३ बळी
Tanay Sanghvi's bowling was impressive on debut, taking 3 wickets in the first innings.
Tanay Sanghvi's bowling


महाराष्ट्र वि झारखंड रणजी ट्रॉफी

नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू तनय संघवीने महाराष्ट्र संघातर्फे रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच आपल्या जलदगती गोलंदाजीने प्रभावी कामगिरी करून छाप पडली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे,पुणे येथील मैदानावर झालेल्या झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या दिवशी सुरवातीलाच दोन बळी घेतले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडची यामुळे पंधराव्या षटकातच ३ बाद ३४ अशी अवस्था झाली. यात झारखंडचा कर्णधार विराट सिंगला तनयने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. त्यानंतर तनयने डावातील शेवटचा फलंदाजही बाद केला व महाराष्ट्राने झारखंडला १६९ धावांत रोखले. १५.२-५-५६-३ अशी तनयची एकूण कामगिरी झाली. त्यानंतर अंकित बावणे, दिग्विजय पाटील व ऋतुराज गायकवाड यांच्या शतकांच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ५ बाद ५२७ धावांचा डोंगर उभारला. पण दुसऱ्या डावात झारखंडने फलंदाजीत चांगली कामगिरी करत ८ बाद ३४४ धावा करून निर्णायक पराभव टाळला.

महाराष्ट्राचे पहिल्या टप्प्यातील रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यापुढील सामने असे होणार आहेत : २६ ते २९ ऑक्टोबर गुजरात विरुद्ध गहुंजे,पुणे येथे - व २ ते ५ नोव्हेंबर बंगाल विरुद्ध इडन गार्डन्स कोलकाता येथे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande