ड्रोन हल्ल्यांमध्ये स्टारलिंकचा गैरवापर, युक्रेनवर इलॉन मस्क यांचा आरोप
वॉशिंग्टन, 25 ऑक्टोबर (हिं.स.)अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युक्रेनवर स्टारलिंकच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मस्क यांचा दावा आहे की युक्रेनने लोकांना मारण्यासाठी ड्रोन हल्ल्यांमध्ये त्याचा वापर केला. स्पेसएक्सने तयार केले
इलॉन मस्क


वॉशिंग्टन, 25 ऑक्टोबर (हिं.स.)अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युक्रेनवर स्टारलिंकच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मस्क यांचा दावा आहे की युक्रेनने लोकांना मारण्यासाठी ड्रोन हल्ल्यांमध्ये त्याचा वापर केला. स्पेसएक्सने तयार केलेल्या आणि युक्रेनच्या लष्करी कारवायांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या नेटवर्कवरून वॉशिंग्टन आणि कीव यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा आरोप करण्यात आला आहे.

मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले, युक्रेनच्या लष्कराने स्टारलिंकच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केले आणि लोकांना मारण्यासाठी आक्रमक ड्रोन हल्ल्यांमध्ये त्याचा वापर केला. त्यांनी पुढे असेही म्हटले की, ही त्रुटी गेल्या आठवड्यात दूर करण्यात आली होती.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, स्टारलिंकच्या अटींमध्ये नेहमीच ती एक नागरी प्रणाली म्हणून परिभाषित केली गेली आहे, लोकांना मारण्याचे साधन म्हणून नाही. या अटींचे उल्लंघन केल्यास सेवा बंद केली जाईल.

इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की स्टारलिंक युक्रेनच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही एकमेव प्रणाली आहे जिला जाम किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही. जर स्टारलिंक बंद झाली, तर युक्रेनच्या आघाडीच्या रेषा तात्काळ कोसळतील.

२०२२ मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणापासून मस्कने युक्रेनबाबत आपली भूमिका अनेक वेळा बदलली असली तरी, कोणत्याही सेवा व्यत्ययासाठी स्पेसएक्स नव्हे, तर अमेरिकन सरकार जबाबदार आहे, असे त्यांनी नेहमीच म्हटले आहे.

रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी युक्रेन नागरी स्टारलिंक उपग्रह दळणवळण प्रणाली आणि तिची लष्करी आवृत्ती, स्टारशील्ड, यावर अवलंबून आहे.

संरक्षण मंत्री येवगेनी खमारा यांनी एका निवेदनात म्हटले, मॉनिटरिंग प्रणाली दर्शवते की स्टारलिंक/स्टारशील्डचा वेग सुधारला आहे. आम्ही आता ताशी ४०० किमी पेक्षा जास्त वेग गाठत आहोत आणि कनेक्शन स्थिर आहे. हा परिणाम आमच्या आघाडीच्या फळीसाठी, आमच्या सैन्यासाठी, ड्रोन ऑपरेशन्ससाठी, लॉजिस्टिक्ससाठी आणि दळणवळण प्रणालींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, सध्या आम्हाला या वेगाची गरज आहे. रात्रीतून सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. त्यांनी जोर देऊन सांगितले, हे खूप महत्त्वाचे आहे, आमच्या आघाडीच्या लॉजिस्टिक्ससाठी आणि रॉकेट-चालित ड्रोनपासून युक्रेनच्या संरक्षणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

हे उपग्रह नेटवर्क युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील वादाचे केंद्र बनले आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेवर रशियाला मदत केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, वॉशिंग्टनने कीवला आगामी क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल सावध करण्यात अपयश आले आणि स्टारलिंकचा वेग कमी करून त्यांच्या लष्करी प्रतिसादाला कमकुवत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande