ELGi चे ड्रिंकटेक इंडिया 2026 मध्ये AB सिरीजचे नवीन ऑइल-फ्री स्क्रू एअर कंप्रेसर सादर
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - जागतिक स्तरावर एअर कंप्रेसर तयार करणाऱ्या ELGi इक्विपमेंट्स लिमिटेड या कंपनीने आज ड्रिंकटेक इंडिया 2026 या प्रदर्शनात आपल्या AB सिरीज ऑइल-फ्री स्क्रू एअर कंप्रेसरची नवीन आवृत्ती सादर केली. हा कार्यक्रम 28 ते 30 ऑक्टोबरद
ELGi


मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - जागतिक स्तरावर एअर कंप्रेसर तयार करणाऱ्या ELGi इक्विपमेंट्स लिमिटेड या कंपनीने आज ड्रिंकटेक इंडिया 2026 या प्रदर्शनात आपल्या AB सिरीज ऑइल-फ्री स्क्रू एअर कंप्रेसरची नवीन आवृत्ती सादर केली. हा कार्यक्रम 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या नवीन AB सिरीजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे “बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.” म्हणजेच अधिक कार्यक्षमता आणि पर्यावरणासाठी अधिक चांगले.

ELGi च्या मते, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

बेटर एफिशियन्सी (अधिक कार्यक्षमता) म्हणजे ग्राहकांना आवश्यक असलेली कॉम्प्रेस्ड एअर (दाबाखालील हवा) तयार करताना ऊर्जेचा आणि इतर साधनसंपत्तीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येणे. यामुळे कंप्रेसरचा दीर्घकालीन खर्च कमी होण्यास आणि उत्पादन प्रक्रिया विश्वासार्हपणे सुरू ठेवण्यास मदत होते.

बेटर प्लॅनेट (पर्यावरणासाठी अधिक चांगले) म्हणजे पाणी आणि ऊर्जेचा जबाबदारीने वापर करणे. यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारी व्यवस्था, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, दीर्घकाळ टिकणारे सुटे भाग आणि कंप्रेसरच्या संपूर्ण वापराच्या कालावधीत संसाधनांची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

बेटर इंजिनिअरिंग → बेटर एफिशियन्सी → बेटर रिसोर्स युटिलायझेशन → बेटर प्लॅनेट

इंजिनिअरिंग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामगिरीचा वारसा पुढे नेणारी कंपनी

ELGi च्या AB सिरीज ची ही नवीन आवृत्ती कंपनीच्या कॉम्प्रेस्ड एअर तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर आधारित आहे.

2002 मध्ये ELGi ने जगातील सर्वात लहान स्क्रू एअर कंप्रेसर विकसित केला. यामुळे कंप्रेसरची रचना आणि निर्मिती करण्याची कंपनीची स्वतःची क्षमता जगभरातील उद्योगासमोर आली. 2019 मध्ये ELGi ने जगातील सर्वात लहान वॉटर-इंजेक्टेड स्क्रू एअर कंप्रेसर सादर केला. या कंप्रेसरच्या माध्यमातून कंपनीने आपले इंजिनिअरिंग कौशल्य आणि तंत्रज्ञानातील क्षमता दाखवून दिली. 2019 हे वर्ष ELGi साठी आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी ओळखले जाते.

कंपनीला टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमधील (TQM) उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित डेमिंग पुरस्कार मिळाला. सहा दशकांहून अधिक काळात जपानबाहेरील जागतिक स्तरावर स्थापित औद्योगिक एअर कंप्रेसर उत्पादक कंपनीला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. अलीकडेच कंपनीने पेटंट मिळालेली डिमांड=मॅच सिस्टीम ही प्रणाली सादर केली. या तंत्रज्ञानामुळे कारखान्यातील हवेची गरज वेळोवेळी बदलत असताना त्यानुसार कॉम्प्रेस्ड एअरचा पुरवठा आपोआप नियंत्रित करता येतो. त्यामुळे आवश्यक तेवढा हवेचा पुरवठा कायम ठेवून अनावश्यक ऊर्जा वापर कमी करण्यास मदत होते आणि कामकाज सुरळीत सुरू राहते.

AB सिरीज जागतिक स्तरावर सादर केल्यानंतर सात वर्षांनी, ELGi कंपनी अभियांत्रिकी तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा करण्याच्या या सर्व तत्त्वांना “बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.” या संकल्पनेअंतर्गत एकत्र आणत आहे.

Elgi इक्विपमेंट्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि ग्लोबल प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख विकास यांनी सांगितले, “AB सिरीजमध्ये सातत्याने अभियांत्रिकी सुधारणा करून बदल घडवून आणले आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही मोटरची कार्यक्षमता, एअरएंडची कार्यक्षमता आणि संपूर्ण कंप्रेसरच्या रचनेत सुधारणा केली आहे. तसेच, कंप्रेसरचे नियंत्रण आणि रिमोट मॉनिटरिंग सुविधाही अधिक चांगली केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने क्लास 0 दर्जाची ऑइल-फ्री कॉम्प्रेस्ड हवा मिळते. तसेच, साधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन करता येते आणि कंप्रेसरच्या कामकाजावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येते. ‘बेटर एफिशियन्सी. बेटर प्लॅनेट.’ ही संकल्पना AB सिरीजमध्ये झालेल्या सुधारणांचे प्रतीक आहे. योग्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगांमध्ये कार्यक्षमता वाढवणे आणि साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर करणे शक्य आहे, असा आमचा विश्वास आहे.”

अभियांत्रिकी तंत्रज्ञानातून ग्राहकांना फायदा

2019 मध्ये AB सिरीज सादर केल्यापासून ELGi ने मोटर, एअरएंड आणि कंप्रेसरच्या संपूर्ण रचनेत वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. यासोबतच स्मार्ट कंप्रेसर व्यवस्थापन आणि जोडलेल्या उपकरणांद्वारे देखरेख करण्याची सुविधाही विकसित केली आहे. ELGi ने केलेल्या तुलनेनुसार, AB सिरीजमध्ये (स्पेसिफिक पॉवर कन्झ्युमशन– SPC) म्हणजेच ठरावीक प्रमाणात कॉम्प्रेस्ड हवा तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या वापरामध्ये 5 ते 6 टक्के सुधारणा दिसून येते. त्यामुळे ठरावीक कामकाजाच्या परिस्थितीत कॉम्प्रेस्ड एअर तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी करण्यास मदत होते. या सिरीजचा फायदा केवळ ऊर्जेची बचत करण्यापुरता मर्यादित नाही. ELGi च्या तुलनात्मक मूल्यांकनानुसार, 40,000 तासांच्या वापराच्या कालावधीत कंप्रेसर खरेदीचा खर्च, वीज खर्च आणि देखभाल खर्च विचारात घेतल्यास एकूण खर्चात 13 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. हा अंदाज कंपनीने नमूद केलेल्या तुलनेसाठीच्या अटींवर आधारित आहे.

ELGi इक्विपमेंट्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष – ISAAME (इंडिया, साउथ एशिया, अफ्रीका और मिडिल ईस्ट) आणि SEA (साउथ ईस्ट एशिया) विभागाचे भावेश कारिया यांनी सांगितले, “अन्नपदार्थ, पेय आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी ‘बेटर एफिशियन्सी’ आणि ‘बेटर प्लॅनेट’ हे दोन्ही मुद्दे आता व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहेत. ग्राहकांना हवेची गुणवत्ता कायम राखून विश्वासार्ह उत्पादन करायचे आहे. त्याचबरोबर ऊर्जा वापर, पाण्याचा वापर, यंत्रणा किती वेळ विनाअडथळा सुरू राहते आणि उपकरणांच्या संपूर्ण वापराच्या कालावधीत कारखाना चालवण्यासाठी किती खर्च येतो, याकडेही त्यांचे लक्ष आहे. AB सिरीज या सर्व गरजा एकत्रितपणे पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे ग्राहकांना उत्पादन प्रक्रिया विश्वासार्हपणे आणि कार्यक्षमतेने सुरू ठेवता येते. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या साधनसंपत्तीचा अधिक योग्य वापर करता येतो.”

भारतातील वाढत्या अन्न आणि पेय उद्योगाला सहाय्य

ज्या उद्योगांमध्ये उत्पादनाचा दर्जा महत्त्वाचा असतो, अशा अनेक उद्योगांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर AB सिरीज सादर केली जात आहे. या उद्योगांमध्ये उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि इतर कामांसाठी कॉम्प्रेस्ड एअर महत्त्वाची भूमिका बजावते.

 

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande