जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात घसरण
जळगाव, 03 ऑक्टोबर (हिं.स.)| जळगाव सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच शनिवारी सोन्याच्या दरात 1,442 रुपयांच
Bullion-Market-Gold-Silver


जळगाव, 03 ऑक्टोबर (हिं.स.)| जळगाव सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच शनिवारी सोन्याच्या दरात 1,442 रुपयांची, तर चांदीच्या दरात 1,030 रुपयांची घट झाली. दर कमी झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 515 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,53,985 रुपये इतका झाला होता. मात्र, शनिवारी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,442 रुपयांची घट नोंदवण्यात आली. परिणामी, तीन टक्के जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,543 रुपये इतका झाला. चांदीही स्वस्त सोन्यासोबतच चांदीच्या दरातही शनिवारी घसरण झाली. शुक्रवारी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो 2,31,750 रुपये होता. शनिवारी बाजार उघडल्यानंतर चांदीच्या दरात 1,030 रुपयांची घट झाली.

त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो 2,30,720 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशातील सराफ बाजारावर होत आहे. अमेरिकन डॉलरची दिशा, बॉण्ड यील्ड्समधील बदल, व्याजदरांबाबतच्या अपेक्षा आणि जागतिक मागणी यांसारख्या घटकांमुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. डॉलर मजबूत झाल्यास डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी महाग ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande