153व्या आंतर संसदीय संघ अधिवेशनासाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व उपसभापती हरिवंश यांच्याकडे
नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळ, 5 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या 153व्या ‘आंतर संसदीय संघ अधिवेशनात आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी टांझानिया प्रजासत्ताका
उपसभापती हरिवंश


नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळ, 5 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या 153व्या ‘आंतर संसदीय संघ अधिवेशनात आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी टांझानिया प्रजासत्ताकातील अरुशा शहराकडे रवाना झाले.

सर्वसमावेशकता, विश्वास आणि सर्वांसाठी संधीच्या माध्यमातून सुशासनाला बळकट करणे आणि समुदायांचे सक्षमीकरण करणे ही या अधिवेशनाची संकल्पना असून, या विषयावर विचारमंथन करण्यासाठी जगभरातील संसद सदस्य एकत्रित होत आहेत.

भारतीय शिष्टमंडळात पुढील संसद सदस्य समाविष्ट आहेत : हरिवंश, राज्यसभेचे उपसभापती आणि शिष्टमंडळाचे नेते, खासदार अनुराग सिंह ठाकूर, अपराजिता सारंगी, डॉ. सस्मित पात्रा, डॉ.संजय जयस्वाल, कमलजीत सेहरावत, डॉ. लता वानखेडे, बिजली कलिता मेधी आणि एन. के. प्रेमचंद्रन.

हे शिष्टमंडळ समकालीन जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आयोजित विविध बैठका, परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होईल आणि या विषयांवर भारताची भूमिका मांडेल.

श्री हरिवंश हे 'नियामक मंडळ’, 'सर्वसाधारण चर्चा', 'तातडीच्या विषयावरील चर्चा' आणि 'आयपीयू (IPU) अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या विचार-विनिमयात सहभागी होतील.

लोकशाही आणि मानवाधिकार, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, शाश्वत विकास, महिलांचा सहभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दहशतवाद-विरोधी उपाय, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, महत्त्वपूर्ण खनिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील कामाचे स्वरूप, तसेच सागरी सुरक्षा, हवामान बदल, पर्वतीय आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण यांसारख्या विविध विषयांवरील चर्चांमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य सहभागी होतील.

आंतर संसदीय संघ अधिवेशनातील (IPU) भारतीय संसदीय शिष्टमंडळाचा सहभाग हा आयपीयूसोबत भारताचे असलेले निरंतर संबंध, संवाद तसचे जागतिक शांतता, विकास, लोकशाही आणि समुदायांच्या सक्षमीकरणाला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर संसदेतील सहकार्यासाठी असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande