आशियाई क्रीडा स्पर्धा : नीरज चौहानला पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक
नागोया (जपान), 03 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय तिरंदाज नीरज चौहानने आशियाई खेळांमधील पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकाच्या सामन्यात नीरजने आपला देशबांधव धीरज बोम्मादेवराचा ६-४ असा पराभव केला आणि वैयक्तिक रिकर्व्ह प्र
नीरज चौहान


नागोया (जपान), 03 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय तिरंदाज नीरज चौहानने आशियाई खेळांमधील पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकाच्या सामन्यात नीरजने आपला देशबांधव धीरज बोम्मादेवराचा ६-४ असा पराभव केला आणि वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात पदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे.

दोन भारतीय तिरंदाजांमधील सामना अत्यंत रोमांचक होता. पहिल्या सेटमध्ये धीरजने ७, ९ आणि १० गुण मिळवले, तर नीरजने १०, ९ आणि १० गुण मिळवले. नीरजने हा सेट २९-२६ असा जिंकून २-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये धीरजने 8, 10 आणि 10 गुण मिळवून उल्लेखनीय पुनरागमन केले, तर नीरजला केवळ 10, 8 आणि 9 गुण मिळवता आले. धीरजने हा सेट 28-27 असा जिंकून सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

तिसऱ्या सेटमध्ये, दोन्ही तिरंदाजांनी सुरुवातीला प्रत्येकी 10 गुण आणि नंतर प्रत्येकी 9 गुण मिळवले. धीरजने शेवटच्या बाणावर 10 गुण मिळवले, तर नीरजला केवळ 9 गुण मिळवता आले. धीरजने हा सेट 29-28 असा जिंकून 4-2 अशी आघाडी घेतली.

त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये, त्याने सलग तीन वेळा 10 गुण मिळवून एकूण 30 गुण मिळवले. धीरजने 9, 9 आणि 10 गुणांसह 28 गुण मिळवले. नीरजने हा सेट 30-28 असा जिंकून सामना 4-4 असा बरोबरीत आणला.

निर्णायक पाचव्या सेटमध्ये, धीरजने 8 गुणांनी सुरुवात केली, तर नीरजने 10 गुण मिळवले. धीरजने दुसऱ्या बाणावर १० गुण मिळवले, पण नीरजने ९ गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली. अंतिम बाणावर दोघांनीही प्रत्येकी १० गुण मिळवले. नीरजने हा सेट २९-२८ असा जिंकून सामना ६-४ ने आपल्या नावावर केला आणि कांस्यपदक पटकावले.

नीरजची ही कामगिरी विशेष आहे, कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात पदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. त्याच्या आधी, २०१० मध्ये तरुणदीप रायने याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande