पोलादपुरात ६.६१ लाखांच्या दागिन्यांची चोरी; आरोपी जेरबंद
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।पोलादपूर तालुक्यातील आड गावात घरातून ६ लाख ६१ हजार ५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी
Jewelery worth ₹6.61 lakh stolen in Poladpur; accused apprehended


रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।पोलादपूर तालुक्यातील आड गावात घरातून ६ लाख ६१ हजार ५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणपती उत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी आड येथे आले होते. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर अंगावर घातलेले दागिने एका पिशवीत ठेवण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय हे दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ६ लाख ६१ हजार ५० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुढे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande