केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे गुजरातमध्ये ‘चिंतन शिबिर 2026’चे आयोजन
* भविष्यासाठी सज्ज, सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या महामार्ग पायाभूत सुविधांच्या निर्मिती नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर (हिं.स.) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे 5 आणि 6 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे ‘चिंतन
Union Ministry of Road Transport and Highways


* भविष्यासाठी सज्ज, सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या महामार्ग पायाभूत सुविधांच्या निर्मिती

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर (हिं.स.) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे 5 आणि 6 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे ‘चिंतन शिबिर 2026’चे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील महामार्ग पायाभूत सुविधांच्या विकास आणि अंमलबजावणीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र, राज्ये आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी या शिबिरात सहभागी होणार आहेत. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच राज्यमंत्री अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यांचे रस्ते वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था तसेच इतर संबंधित भागधारकांना चिंतन शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सहभागामुळे केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढण्यासोबतच क्षेत्रीय स्तरावरील अनुभव, सर्वोत्तम पद्धती आणि व्यावहारिक उपायांची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे.

दोन दिवसांच्या या चिंतन शिबिरात महामार्ग क्षेत्रातील प्रकल्पांची अंमलबजावणी, गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अंमलबजावणीतील प्रमुख अडचणी ओळखणे तसेच नाविन्यपूर्ण आणि पुनरावृत्ती करता येण्याजोग्या उपाययोजनांवर, धोरणात्मक आणि संस्थात्मक हस्तक्षेपांवर सविस्तर विचारमंथन केले जाईल.

या चिंतन शिबिरात 5 प्रमुख विषयांवर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये पीएम गतिशक्ती आणि एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजन; भूसंपादन आणि भूमी राशी; आदर्श सवलत करार आणि मानांकन; सुरक्षित महामार्गांची रचना; तसेच गुणवत्ता हमी आणि प्रकल्प देखरेख या विषयांचा समावेश आहे.

पीएम गतिशक्ती आणि एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनावरील सत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी समन्वयित आणि एकात्मिक नियोजनावर भर दिला जाईल. भूसंपादन आणि भूमी राशी या विषयावरील चर्चेत प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्याची तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक सुरळीत करण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. आदर्श सवलत करार आणि मानांकन या विषयावरील सत्रात संबंधित करारविषयक आणि अंमलबजावणीच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाईल. सुरक्षित महामार्गांची रचना या सत्रात महामार्गांच्या नियोजन आणि विकासामधील रस्ता सुरक्षेशी संबंधित बाबींवर चर्चा केली जाईल. गुणवत्ता हमी आणि प्रकल्प देखरेख या सत्रात गुणवत्ता, देखरेख आणि प्रकल्पांच्या परिणामकारकतेला अधिक बळकटी देण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचारमंथन केले जाईल.

हे चिंतन शिबिर केंद्र आणि राज्यांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबरोबरच अधिक सुरक्षित, उच्च दर्जाच्या आणि भविष्यातील गरजांसाठी सज्ज महामार्ग पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लावण्यासाठी केंद्रित, परिणामाभिमुख विचारमंथन आणि कृतीयोग्य उपाययोजनांसाठी एक व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande